मूक अभिनय करून नागरिकांचे मन हेलावणारे केले नाट्य
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ढोलताशा व लेझिमच्या गजरात गणरायाला निरोप दिला. शाळेची मिरवणूक सोयगाव शहरातील दुर्गा भवानी मंदिर येथून प्रयाण होऊन मार्गे जुना बाजार चौक, महर्षी वाल्मिकी मंदिर, छत्रपती शिवाजीमहाराज चौकातून बेलेश्वर नाल्यात गणपती बाप्पाचे विसर्जन केले. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी ढोल पथक, लेझिमच्या तालात नृत्य केले. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्रातील क्रांतिकारक यांचा पेहराव केलेला होता. जल सुरक्षा व बेटी बचाव यावर मूक अभिनय करून शहरातील नागरिकांचे मन हेलावणारे नाट्य केले.
मिरवणुकीत संस्थेचे संचालक शिवदीप रंगनाथराव काळे, रवींद्र काळे, विजय गव्हाड, कृष्णा जुनघरे, संस्थेचे प्रतिनिधी प्रा. कमलेश काळे, शाळेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. दादासाहेब पवार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस, उपमुख्याध्यापक सागर घाटे, योगेश काळे, अंजली कथळकर, शीतल पवार, निकिता देशमुख, शीतल गावांडे, रोहिणी पाटील, शीतल काटोले, शहादात्ता तडवी, आशा पंडित, नम्रता पाटील, विद्या पाटील, जयश्री श्रीवास्तव, प्रेरणा मोरे, किर्ती पाटील, संदीप निकम, संजय डापके, तौफिक पठाण, हरीश कोळी, उमेश जाधव, ज्ञानेश्वर पंडित आदी सहभागी झाले होते.