साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बिलाखेड येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्यावतीने गुरुवारी, २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान सीबीएसई प्रादेशिक ९ कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ५२पेक्षा अधिक सीबीएसई शाळांमधील ७५० विद्यार्थी सहभाग घेणार असल्याची माहिती पालक संघाचे पीटीपी कमेटीचे उपाध्यक्ष डॉ. सुनील राजपूत यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला शाळेच्या मॅनेजर सिस्टर मेरी कोईकरा, प्रिन्सीपल सिस्टर डॉ. बिंदू अँटनी, क्लार्क विजय चौधरी आदी उपस्थित होते.
कबड्डी स्पर्धेला गुरुवारी, २६ ऑटोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होईल. याप्रसंगी खा.उन्मेष पाटील, सीबीएससीचे जळगाव शहर समन्वयक सुषमा कांची, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांच्यासह फादर जोबी काचपल्ली आदी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचा समारोप शनिवारी, २८ ऑटोबर रोजी होणार आहे. याप्रसंगी आ. मंगेश चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, तहसीलदार प्रशांत पाटील, फादर श्री जॉय वटोली यांची उपस्थिती असेल. स्पर्धेसाठी वैद्यकीय सेवा व सुविधा डॉ. सुनील राजपूत, साई हॉस्पीटल यांची असेल. स्पर्धेसाठी ४ मैदान तयार केले आहे. विद्यार्थ्यांची राहण्याची विशेष सोय करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेचे प्रक्षेपण केले जाणार असल्याचेही डॉ. राजपूत यांनी सांगितले.