बोरिसच्या कबड्डी खेळाडूचा रेल्वेतून पडून मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी)
धावत्या रेल्वेतून पडून धुळे जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २६ एप्रिलरोजी सकाळी पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावाजवळ घडली पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशाल किरण बोरसे (वय २५, रा.बोरिस ता.जि. धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ यांच्यासह राहत होता. पाचोरा ते गाळण रेल्वे स्टेशनदरम्यान तारखेडानजीक ऑफलाइनवरील खंबा किलोमीटर क्रमांक ३६५/२०१८ दरम्यान अज्ञात तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती पाचोरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली.
पंचनामा करत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पाचोरा पोलीस करीत असतानाच त्यांना तरुणाबाबत माहिती मिळाली.
धुळे तालुक्यातील बोरीस येथील रहिवासी तर सुरत येथे शिक्षण घेणारा विशाल बोरसे असे या विद्यार्थ्यांचे नाव निष्पन्न झाले. सैनिक भरतीचा पेपर देण्यासाठी रेल्वेने सुरतवरून जळगावमार्गे मुंबईकडे व नंतर मित्रासोबत सिकंदराबादला रवाना होणार होता. रस्त्यात दुर्घटना घडली. विशाल उत्तम कबड्डी खेळाडू असल्याने सैनिकात नोकरीचे स्वप्न घेऊन तो जगत होता. त्याचं स्वप्न अपूर्ण राहीले दुर्दैवी मृत्यू झाला.