साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालातील विद्युत अभियांत्रिकी शाखेतर्फे अभियंता दिनानिमित्त “प्रश्न मंजुषा” स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उदघाटन आणि दीप प्रज्वलन प्राचार्य डॉ .संजय सुगंधी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, विभागाध्यक्ष प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. राजेश वाघुळदे, प्रा. के. एम. महाजन, प्रा. प्रवीण भंगाळे, प्रा. अश्विनी पाटील, आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ७० विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली, त्यातून अंतिम फेरीसाठी १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रत्येकी तीन विद्यार्थी असे पाच गट तयार करण्यात येऊन प्रत्येक गटाला वैद्न्यानिकांची नावे देण्यात आली. अंतिम स्पर्धेसाठी एकूण पाच फेऱ्या घेण्यात आल्या ज्यात चालू घडामोडी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऑडिओ आणि व्हिजुअल व इतर खेळांचा समावेश होता.
प्रश्न मंजूषा स्पर्धेप्रसंगी विद्यार्थ्यांना उद्देशून प्राचार्य डॉ. संजय सुगंधी म्हणाले की भविष्यातील स्पर्धात्मक युगात यश मिळवायचे असेल तर असे कार्यक्रम विविध स्तरांवर योजिले जाण्याची अत्याधिक गरज आहे.
प्रश्न मंजूषा स्पर्धेचे सूत्र संचालन आणि आभार प्रा. राजेश वाघुळदे यांनी केले तर गुण लेखिका म्हणून प्रा. अश्विनी पाटील आणि जया साळुंखे- नेमाडे यांनी काम पाहिले. विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रमाण पत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यशस्वीतेसाठी प्रा. सचिन नाथ, उमाकांत कोठोके, राहुल पाटील तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी नरेंद्र पाटील, यशवंत पाटील, सागर कुलकर्णी यांनी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. राजेश वाघुळदे यांनी यशस्विरीत्या धुरा सांभाळली.