नुसतं इंडियाचं भारत केले तरी मूळ प्रश्न सुटणार नाही

0
50

मुंबई ः प्रतिनिधी

मराठवाडा मुक्ती संंग्रामच्या निमित्ताने संभाजी नगर येथे उद्या मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ उद्या संभाजीनगरला येईल. त्यांच्या राहण्याची सोय येथील हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे तर विश्रामगृहेही बुक करण्यात आले आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीसाठी इतका थाट कशाकरता? असा सवाल संजय राऊतांना विचारण्यात आता. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “या सरकारचे आम्ही अंत्यसंस्कार थाटामाटतच करणार आहोत. हे त्यातच जाणार आहेत. तीन तासांसाठी संपूर्ण प्रशासन वेठीस धरता. हा सगळा खर्च तुम्ही दुष्काळग्रस्तांवर खर्च करा. येथे प्यायला पाणी नाही, अनेक प्रश्न आहेत.

आमचे लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे आहे. बैठकीनंतर होणाऱ्या पोपटपंचीकडे जास्त लक्ष आहे, असेही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या बॅनर्सवरूनही संजय राऊतानी सरकारला फटकारले आहे. स्वामी रामानंद तिर्थ, गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण आदी नेते या संग्रामात होते. त्यांचे या बॅनरवर फोटो नाहीत मग हे नेते स्वातंत्र्य संग्रामात नव्हते तर काय मोदी, शाह आणि रावसाहेब दानवे संग्रामात होते का? असा सवालही राऊतांनी विचारला.

देश दुःखसागरात अन्‌‍‍ पंतप्रधान स्वतःवर फुलं उधळून घेताहेत

डरपोक आणि बेकायदा सरकार असून प्रत्येक संकटातून सरकार पळून जातेय. देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काश्मीरमध्ये कर्नल, मेजर डीएसपी शहीद झाले. चार जवान लष्करी अधिकारी एकाच वेळेला शहीद होतात. सारा देश दुःखसागरात बुडाला हे ऐकून आणि आमचे पंतप्रधानांनी तिथे दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयात स्वतःवर फुले उधळून घेतली, अशी टीका राऊतांनी केली.

मला आठवतंय दिल्लीत बॉम्ब स्फोट झाले. खान मार्केटमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. तेव्हा शिवराज पाटील गेले होते. नंतर फक्त त्यांनी शर्ट बदलला. फक्त शर्ट बदलला म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काल तिकडे चार जवांनांनी हौतात्म्य पत्कारले आणि आमचे पंतप्रधान आणि भाजपा दिल्लीतील मुख्यालयात उत्सव साजरा करत होते. स्वतःवर फुलं उधळून घेतली. हा त्यांचा सनातन धर्म आहे. हा आमचा सनातन धर्म नाही. हा त्यांचा भारत वेगळा आहे, तो आमचा भारत नाही.जे जवान शहीद झाले ते भारताचे सुपूत्र होते. नुसतं इंडियाचं भारत केले की मूळ प्रश्न सुटणार नाही. राजकीय कारणासाठी हे ढोंग बंद केले पाहिजे. चार जवानांचं हौतात्म्य हा सनातन धर्माचा भाग होता आणि तुम्ही फुलं उधळून घेताय. हे प्रश्न आम्हाला उद्या विचारायचे आहेत. कारण देशाची अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा ही राजनाथ सिंहांची जबाबदारी आहे आणि ते भाजपा कार्यालयात हजर होते. देश कोणत्या दिशेने चाललाय, असेही संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here