Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पत्रकार, आमदाराच्या वादात मध्यस्थी करुन प्रकरण थांबविणार
    पाचोरा

    पत्रकार, आमदाराच्या वादात मध्यस्थी करुन प्रकरण थांबविणार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    येथील पाचोरा-भडगाव मतदार संघातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेचा तालुका, जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटना, राजकीय नेते यांच्यातर्फे निषेध मोर्चा, आंदोलन करण्यात आले. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी प्रत्येक स्तरातून करण्यात येत आहे. दुसरीकडे या घटनेबाबत आ.किशोर पाटील आणि पत्रकार संदीप महाजन यांच्यामध्ये शिवीगाळ, मारहाण यासारख्या घटना घडून आल्या. या घटनेचाही संपूर्ण राज्यभरात निषेध केला जात आहे. या घटनेला आगळे वेगळे रूपांतर पहावयास मिळत आहे. या घटनेत त्या बालिकेला व तिच्या कुटुंबाला न्याय देणे अत्यंत गरजेचे असल्याने आ.किशोर पाटील आणि संदीप महाजन या दोघांनीही दोन-दोन पाऊल मागे येऊन कुठेतरी हे प्रकरण थांबविणे गरजेचे असल्याचे माजी आ.दिलीप वाघ यांनी शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

    यावेळी न.पा.मा. गटनेते संजय वाघ, माजी नगरसेवक भूषण वाघ, शशिकांत चंदिले, रंजीत पाटील, सुनील पाटील, खलील देशमुख, प्रकाश भोसले, अझहर खान, सुदर्शन महाजन, विनोद पाटील, बंटी माळी, गोपी पाटील, राज जगताप आदी उपस्थित होते.

    ते पुढे म्हणाले की, यासाठी मी स्वतः आ.किशोर पाटील आणि संदीप महाजन यांच्यात मध्यस्थी करून हे प्रकरण कुठेतरी थांबवा, अशी विनंती करणार आहे. कारण या प्रकरणामुळे पाचोरा-भडगाव मतदार संघाचे नाव राज्यभर वेगळ्या रूपाने चर्चिले जात असल्याचे माजी आ.दिलीप वाघ यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026

    Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक

    February 19, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.