शासनाच्या विरोधात चोपडा महाविकास आघाडीतर्फे ‘जोडे मारो आंदोलन’

0
27

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शासनाचा व्यक्त केला निषेध

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्यावतीने तसेच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी, २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता ‘जोडे मारो आंदोलन’ करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी चोसाकाचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, के.डी.चौधरी, प्रदीप पाटील, गोविंदा महाजन, शेख आरिफ शेख सिद्दिकी, नंदकिशोर पाटील, तुकाराम पाटील, शिवसेनेचे देवेंद्र पाटील, सुनील बडगुजर, कम्युनिष्ट नेते अमृतराव महाजन, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद, नेमीचंद जैन, रमेश शिंदे, मधुकर पाटील, धनंजय पाटील, प्रकाश पाटील, अनिल पाटील, इश्तियाक जहाँगीरदार, महिला आघाडीच्या अनिता शिरसाठ, जयश्री बडगुजर, फातिमा पठाण, योगिता चौधरी, चेतन बाविस्कर, देवकांत चौधरी, प्रतापराव सोनवणे, छगन पाटील, अशोकराव साळुंखे, अनिल वाघ, गोपाल पाटील, व्ही.के.पाटील, देवानंद शिंदे, राजकुमार सोनवणे, भाऊसाहेब साळुंखे, व्ही.एच.पाटील, यशवंत खैरनार, शशिकांत चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here