साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षण मागणीच्या उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केल्याच्या निषेधार्थ सोमवारी, ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील राजमाता जिजाऊ चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्यावतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनावेळी भाषण आणि घोषणांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौक दणाणला होता.
या घटनेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी गृहमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशा मागण्यांसाठी जामनेर तालुका मराठा समाजाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदीप गायके, संजय गरुड, एस.टी.पाटील, शंकर मराठे, ॲड.ज्ञानेश्वर बोरसे, वंदना चौधरी, राहुल चव्हाण, अश्फाक पटेल, प्रफुल्ल लोढा, अनिल बोहरा, राजू खरे, ईश्वर पाटील, किशोर पाटील, शंकर राजपूत, डॉ.प्रशांत पाटील, विकास पाटील आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आंदोलनात यांचा होता सहभाग
आंदोलनात दिलीप खोडपे, माधव चव्हाण, डॉ.प्रशांत भोंडे, विश्वजित पाटील, चंद्रकांत बाविस्कर, सागर पाटील, अशोक पाटील, राम अपार, अमोल पाटील, दत्ता साबळे, प्रल्हाद बोरसे, नाना पाटील, गोपाल पाटील, ईश्वर महाजन, विशाल लामखेडे, पंकज पाटील, कृष्णा सोनवणे, कल्पेश पाटील, तुषार पाटील, संतोष टहाकळे, विशाल मुळे, जावेद मुल्लाजी, सचिन बोरसे, संतोष झाल्टे, अविनाश बोरसे, अमोल ठोंबरे, प्रल्हाद सोनवणे, पंढरीनाथ पाटील, अमोल सपाटे, सुभाष पाटील, रमाकांत पाटील, सुदाम पाटील, नरेंद्र जंजाळ, प्रकाश बोरसे, विनोद माळी, पिंटू चौधरी, नरेंद्र धुमाळ, विजय पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
