साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आता जरंडीकरांना घरातील साचलेला केर कचरा गुरुवारी (दि.११)पासून संगीतमय घंटा गाडीने संकलित येणार आहे.जरंडी ग्रामपंचायतीला आता नवीन घंटा गाडी मिळाली असून सोयगाव तालुक्यात संगीतमय घंटागाडी असलेली जरंडी ग्रामपंचायत ठरली आहे. या घंटागाडीचे गुरुवारी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यात हिवरेबाजार आणि पाटोदा या ग्राम पंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत जरंडी ग्रामपंचायत ने महिनाभरापासून आगेकूच केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष चा मुहूर्त साधत जरंडी ग्रामपंचायतने आता ग्रामीण भागही हायटेक करण्याच्या प्रयत्नात गावातील केर कचरा संकलित करण्यासाठी संगीतमय घंटा गाडीचा अनोखा प्रयोग हाती घेत गुरुवारी या अनोख्या घंटा गाडीचा लोकार्पण करण्यात येणार आहे.
गावात घंटागाडी फिरवून संगीत वाजवून कचरा संकलित करण्यात येणार आहे त्यामुळे शहरी भागा प्रमाणे आता जरंडीने वाटचाल केली आहे.