Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»सोयगाव»जरंडी ग्रामपंचायत ठरली मराठवाड्यात ‘अव्वल’
    सोयगाव

    जरंडी ग्रामपंचायत ठरली मराठवाड्यात ‘अव्वल’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘माझी वसुंधरा’ उपक्रमात पटकाविला विभागीय पुरस्कार

    साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

    जिल्ह्यातील तब्बल आठ महिला सदस्य असलेल्या जरंडी ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट काम करून गावाचा चेहरा मोहरा बदलवून टाकत निसर्गाशी संबंधित उपक्रम गावात राबवित घनवृक्ष लागवड, हा प्रयोग यशस्वी करून मराठवाड्यात माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये मराठवाड्यात अव्वल स्थान पटकावून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५० लाख रुपये मिळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयगावच्या जरंडी ग्रामपंचायतीचा झेंडा आता मराठवाडा भर रोवला गेला आहे.

    पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत जरंडी ग्रामपंचायतने राबविले. त्यामध्ये घन वृक्ष लागवड अंतर्गत २५ हजार वृक्षांची गावात लागवड करून विक्रम प्रस्थापित केला. तसेच वृक्ष लागवडीसाठी इतर गावांना चालना देण्यासाठी ग्रामपंचायतीने रोपवाटिका उभारून इतर ग्रामपंचायतींना वृक्ष पुरवठा केला. तसेच संपूर्ण गाव भयमुक्त व भीतीमुक्त करण्यासाठी गावात विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसवून व्यायामशाळा, हुतात्मा स्मारक गार्डन, पक्षांची किलबिलाटची शाळा, संगीत कारंजे, विद्यार्थ्यांना अभ्यासिका, गावात चित्र रेखाटन आदी भरीव उपक्रम राबवून गावाचा चेहरा मोहरा बदलवुन गावच बदलवून टाकले. त्यामुळे ग्रामपंचायतला मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन्ही रणरागिणींचा सत्कार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरपंच स्वाती पाटील, वंदना पाटील या दोन्ही रणरागिणीचा सत्कार करण्यात येऊन ५० लाख रुपये पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानात ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचे डेस्कटॉप मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणामार्फत करण्यात आले.या दोन्ही मूल्यमापनमधील एकूण गुणांच्या आधारे विभाग स्तरावर जरंडी ग्रामपंचायतीची प्रथम पारितोषिकसाठी निवड केली आहे.

    यांनी केला जल्लोष

    याबद्दल सरपंच स्वाती पाटील, वंदनाताई पाटील, उपसरपंच संजय पाटील, नीलिमा पवार, द्वारकबाई राठोड, कल्पना मुठ्ठे, सलीमाबी तडवी, लिलाबाई निकम, चंद्रकला चौधरी, मधुकर पाटील, मधुकर सोनवणे, ग्रामसेवक सुनील मंगरुळे, संतोष पाटील, सतीश बाविस्कर, अंबु राठोड आदींनी जल्लोष केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Soygaon : १३ वर्षांनंतर घोसला आरोग्य उपकेंद्र पुन्हा कार्यान्वित

    December 15, 2025

    flood ; पुरात रस्ताच गेला वाहून

    October 3, 2025

    Water bodies dry : वेताळवाडी, धिंगापूर,घोसला शिवारातील पाणवठे कोरडेठाक; वन्यप्राणी मृत्यूच्या दाढेत

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.