खा.स्मिताताई वाघ यांच्या हस्ते देऊन स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. डी. पाटील यांना नुकत्याच झालेल्या बहिणाबाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले. कविवर्य पुरुषोत्तम नारखेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पवन चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव व अपर्णा सेवा ट्रस्ट कविवर्य पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या अठराव्या बहिणाबाई सोपानदेव खान्देश राज्य मराठी साहित्य संमेलनातर्फे खा.स्मिताताई वाघ यांच्या हस्ते डी.डी.पाटील यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.फुला बागुल, उद्घाटक आ.राजू मामा भोळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बी. एन.चौधरी, स्वागताध्यक्ष पुष्पा साळवे, आयोजक डॉ.विलास नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे डी.डी.पाटील अध्यक्ष आहेत. जामनेरमध्ये दरवर्षी त्यांच्यातर्फे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. तसेच ते अहिल्याबाई होळकर वाचनालयाचे अध्यक्षही आहेत.त्यांना मिळालेल्या सन्मानाबाबत राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.गिरीश महाजन, जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्यासह कवी, साहित्य, शैक्षणिकसह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.