साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथे राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) बैठक नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे होते. यावेळी जामनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. व्यासपीठावर रवींद्र पाटील (प्रदेश सरचिटणीस), तालुक्याचे नेते बंगालीसिंह चितोडीया, युवा नेते अरविंद चितोडीया, अरविंद तायडे यांची उपस्थिती होती.
यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील तर कार्याध्यक्ष म्हणून किरण राजमल पाटील (केकतनिंभोरा), नरेंद्र जंजाळ (विधानसभा क्षेत्रप्रमुख), विकास दशरथ पाटील (तालुका सचिव), प्रभू भिवा झाल्टे (शहराध्यक्ष), पंडीत गणपत नाईक (तालुका उपाध्यक्ष), अभयसिंग राठोड (कार्याध्यक्ष), दत्तात्रय नेरकर (ओबीसी शहराध्यक्ष), विकास चव्हाण (व्ही.जे.एन. टी. तालुकाध्यक्ष), श्रीराम जोशी (उपाध्यक्ष), विलास पाटील (शेंदुर्णी शहराध्यक्ष) या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती बैठकीत करण्यात आली.
बैठकीत जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, सरचिटणीस रवींद्र नाना पाटील, बंगालीसिंह चितोडिया, युवा नेते अरविंद चितोडीया यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विकास पाटील तर आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले.