महाविकास आघाडीने दिले तहसिलदारांना निवेदन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी:
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील महिला व मुली सुरक्षित नाही. रोज अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आता तर ज्ञानदानासारख्या पवित्र ठिकाणीही घाणेरडे कृत्य होत असल्याच्या भावना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर येथील घटनेचा निषेध करतांना येथील तहसील कार्यालयात व्यक्त केल्या. याबाबत जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर येथील दोन चिमुकलींवर अत्याचार घडल्यानंतर त्यांचे पालक संबंधित पोलीस स्टेशनला गेल्यानंतर १२ तास उलटूनही गुन्हा नोंदविला नाही. त्याचप्रमाणे कोल्हापूर, पुणे, अकोला, नागपूर, लातूर, नाशिक, मुंबई या मोठ्या शहरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातही दररोज अत्याचाराच्या घटना घडतांना दिसून येत आहेत. गृहमंत्र्यांचा वचक राहिलेला नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. बदलापूर येथील घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, शक्ती कायदा अंमलात आणावा, अशा मागण्या महाविकास आघाडीने निवेदनाद्वारे केल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
यावेळी डी. के. पाटील, किशोर पाटील, वंदना चौधरी, डॉ.ऐश्वर्या राठोड, शंकर राजपूत, शरद पाटील, मुलचंद नाईक, ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, दिलीप पाटील, प्रल्हाद बोरसे, विश्वजीत पाटील, निर्मला शिंदे, प्रमिला पवार, नलिनी चव्हाण, दिपाली पाटील, वैशाली पाटील, रत्ना सुरळकर, मुलकण वनारा, अशोक चौधरी, शेरखा पठाण, अनिल बोहरा, दत्ता साबळे, शक्ती सुरवाडे, प्रवीण पाटील, सौरभ आवचारे, गजानन खराटे, गणेश पाटील, सचिन पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.