जामनेरला सप्तश्रुंगी दुर्गा उत्सव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी जगदीश सोनार

0
162

खजिनदारपदी मनीष पाटील यांची निवड

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

शहरातील जळगाव रस्त्यालगत स्थित प्रकाश नगरातील सप्तश्रुंगी दुर्गा उत्सव मित्र मंडळ मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत देवीची स्थापना करण्यासोबत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

त्यात मंडळाच्या अध्यक्षपदी जगदीश बाबुराव सोनार, उपाध्यक्ष प्रसाद संजय पाटील, सचिव ॲड.आशुतोष चंदले, सहसचिव मनोज महाजन, खजिनदार मनीष पाटील, सल्लागार अविनाश मराठे, सहसल्लागार उदय पाटील यांच्यासह सदस्यांचा निवडीत समावेश आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here