साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील शिवाजी नगरात स्व.पद्मश्री ना. धो. महानोर साहित्य नगरी एकलव्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे नुकतेच चौदावे खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष म्हणून नाशिक येथील मराठी अहिराणी, कवी, गझलकार, गीतकार, लेखक, अभिनेता अजय बिरारी होते. स्वागताध्यक्ष म्हणून जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना महाजन उपस्थित होत्या. उद्घाटक म्हणून ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, तर समारोपीय सत्राचे अध्यक्ष बी.एन.चौधरी (सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा साहित्यिक, धरणगाव) होते.
यावेळी कवयित्री सीमाराणी बागुल, डॉ. स्वाती विसपुते, ह.भ.प. रामकृष्ण दादा पाटील, उत्कृष्ट कथाकार राहुल निकम आदी मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून, स्वागत गीत सादर करून संमेलनाला सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सत्रात जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित प्रातिनिधीक कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बी.एन.चौधरी यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डी.डी.पाटील यांनी केले. सुत्रसंचालन कवी विनोद जाधव तर आभार सहसचिव जितेंद्र गोरे यांनी मानले.
उद्घाटन सत्रानंतर द्वितीय सत्र कथाकथनाचे सुरू करण्यात आले. अध्यक्षस्थानी उत्कृष्ट कथाकार राहुल निकम होते. यावेळी डॉ. स्वाती विसपुते, डॉ. संगीता गावंडे, रमेश तुळशीराम बनकर यांनी आपापल्या कथा सादर करून प्रेक्षकांना मोहीत केले. सुत्रसंचालन गणेश पाटील तर आभार रूपेश बिऱ्हाडे यांनी मानले.
तृतीय सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी बी.एन.चौधरी (साहित्यिक धरणगाव) होते. प्रमुख पाहुणे म्हणून मधु पांढरे (पहूर येथील ज्येष्ठ साहित्यिक उत्कृष्ट कथाकार आणि कवी) उपस्थित होते. कवी संमेलनात कवी विनोद जाधव, विजय सूर्यवंशी, गणेश पाटील, रूपेश बिऱ्हाडे, जितेंद्र गोरे, प्रा.डॉ. अक्षय घोरपडे, रमजान तडवी, ज्योतीनाथ चिखले, विवेक म्हस्के, मनोज विसपुते, कृष्णा तपाने, सुकदेव महाजन, कवी बी शंकरराव, भगवान जाधव, निवृत्तीनाथ कोळी, गोविंद पाटील, राहूल रॉय मुळे, कवयित्री सीमाराणी बागूल, पुष्पलता कोळी, जयश्री काळवीट, संध्या भोळे, इंदिरा जाधव, वर्षा पाटील, रूपाली पाटील, संगीता गावंडे, डॉ.स्वाती विसपुते यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन विजय सूर्यवंशी तर गणेश पाटील यांनी आभार मानले.
चतुर्थ सत्रात विविध तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणात सामाजिक कार्यकर्ते राहूल रॉय मुळे यांचा ओवी संग्रह प्रत्येक बक्षीसासोबत भेट देण्यात आला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष मधू पांढरे, सचिव गोरख सूर्यवंशी, सहसचिव जितेंद्र गोरे, सदस्य विनोद जाधव, सुकदेव महाजन, श्रीकांत पाटील, कवी विजय सूर्यवंशी, रूपेश बिऱ्हाडे, गणेश पाटील, विवेक म्हस्के यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन कवी विनोद जाधव तर आभार सुकदेव महाजन यांनी मानले.