साईमत, जामनेर : प्रतिनिधी
या नभाने या भुईला दान द्यावे, मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो, पाण्यात लगटले पाय, फुलात न्हाली पहाट ओली यासारख्या अजरामर कवितांनी आनंदयात्री परिवार निर्मित’आठवणीतील महानोर’ कार्यक्रमाने जामनेरकर रसिक भारावले होते. रानकवी स्व.ना.धों.महानोर यांना आदरांजली वाहणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब व आनंदयात्री परिवार यांच्यावतीने केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी अभियंता जे. के.चव्हाण, परिवर्तनचे रंगकर्मी शंभू पाटील, अभिनेते हर्षल पाटील, सोनाली पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला ‘जात्यावरची ओवी’ सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
‘मी रात टाकली’, आम्ही ठाकरं ठाकरं, गोऱ्या देहावरची कांती, भरलं आभाळ, घन ओथंबूनी येती…यासारख्या गीतांनी कार्यक्रम लक्षवेधी ठरला. कार्यक्रमात डॉ.प्रज्ञा साठे, डॉ.पल्लवी सोनवणे, कांचन महाजन, सुधीर साठे, डॉ.राजेश सोनवणे, प्रा.नितीन पाटील यांनी कविता वाचन केले तर ख़ुशी पांडे, मानसी शेळके, डॉ.भाग्यश्री चौधरी, डॉ.अमोल सेठ, डॉ.चंद्रशेखर पाटील, डॉ.गिरीश पाटील यांनी गायन केले. कार्यक्रमाचे निवेदन गणेश राऊत तर वाद्य सहाय्य आदित्य पाटील, अमेय महाजन यांनी केले.
यांचे लाभले सहकार्य
कार्यक्रमासाठी डॉ.आशिष महाजन, दिग्दर्शन कडू माळी, सुधीर साठे, रंगमंच नेपथ्य तथा प्रकाश योजना सुहास चौधरी, संगीत निर्देशन रौफ शेख, संगीत संयोजन सुरसंगम ऑर्केस्ट्रा, तंत्र सहाय्य अमरीश चौधरी, डॉ.पराग पाटील, डॉ.निलेश पाटील, बंडू जोशी, संकेत पमणानी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात लोकसंस्कृती सादरीकरणात रेणुका चौधरी, डॉ.सीमा पाटील, शिल्पा पाटील, वृंदा जोशी यांनी सहभाग घेतला. यावेळी रंगकर्मी शंभु पाटील, जे.के.चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तथा आभार सुहास चौधरी यांनी मानले.