वाटपात टाकळी खुर्द, पळासखेडा बु. येथील जि.प.च्या शाळांचा समावेश
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांच्या विचाराने प्रेरित जामनेर तालुका सत्यशोधक समाज संघातर्फे तालुक्यातील टाकळी खुर्द, पळासखेडा बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास २०० च्यावर विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
टाकळी येथील कार्यक्रमात अध्यक्षस्थानी गणेश महाजन होते. यावेळी मुख्याध्यापक लवगे, रेखा पाटील, विजय पवार, रवींद्र परदेशी, गोपाल चौधरी, दीपकसिंग राजपूत, संदीप पालवे तर पळासखेडा येथे मुख्याध्यापक रमेश चवरे, अर्चना पाटील, सोनाली सोनवणे, रामदास पांगूड उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी जे.बी.चौधरी, अर्जुन आमले, विनोद जाधव, राजू माळी, श्री.जगताप, मोहन बावस्कर, ग्रा.पं.सदस्य बाळू चवरे यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाजाचे प्रचारक कैलास महाजन, पवन माळ, दीपक माळी, रमेश वराडे यांनी परिश्रम घेतले.
