न्यू इंग्लिश स्कुलमध्ये आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर उत्साहात
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी नुकतेच मार्गदर्शन शिबिर घेण्यात येऊन मान्यवरांनी आरोग्याविषयीचे धडे दिले. अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, आशा कुयटे, सिकल सेल कार्यक्रम समन्वयक शिवाली देशमुख उपस्थित होत्या.
वय वर्षे १० ते वय वर्ष १९ पर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश किशोरवयीन गटात होतो. किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाची आवश्यकता का आहे, किशोरवयीन अवस्थेत कोणते शारीरिक व मानसिक बदल होतात, किशोरवयीन वयात आई-वडील पालक यांच्यासोबत संवाद साधणे का गरजेचे आहे, वडीलधाऱ्यांचा सल्ला का गरजेचा आहे, मुलांमध्ये या वयात काय समस्या येतात, मुलींमध्ये काय समस्या येतात, त्यावरील उपाययोजना याबाबत डॉ.पल्लवी राऊत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शिवाली देशमुख यांनी सिकलसेल आजाराबाबत माहिती दिली. याप्रसंगी आरोग्य विभागाच्यावतीने किशोरवयीन मुलींच्या भावनिक, मानसिक, शारीरिक समस्यांविषयी माहितीपत्रक वाटण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेश महाजन, एल.एस.वारके, एम.बी.जोशी, आर. इ.इधाटे, रुपेश बावस्कर यांच्यासह किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. सूत्रसंचालन यु.एन.सुरळकर तर नलिनी पाटील यांनी आभार मानले.