जामनेरला ‘महास्वच्छता अभियान’ अंतर्गंत १० टन कचरा केला संकलित

0
33

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग, जि. रायगड तसेच महाराष्ट्र शासन व भारत सरकारतर्फे आयोजित “स्वच्छता हीच सेवा” महास्वच्छता अभियान मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते श्रीफळ फोडून राबविण्यात आले. अभियानामुळे संपूर्ण शहर चकाचक करण्यात आले. अभियानात न.पा.चे उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरसेवक डॉ. प्रशांत भोंडे, आतिष झाल्टे, बाबुराव हिवराळे, सुहास पाटील, बाजार समितीचे सभापती राजमल भागवत, प्रशासक तथा मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, उपमुख्याधिकारी डांगे तसेच सर्व नगरसेवक यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी, नागरिक, ‘श्री’ सदस्य सहभागी झाले होते.

अभियानासाठी १४ ट्रॅक्टर, ८ रिक्षा तसेच नगरपालिकामार्फत १६ वाहनांचे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे जामनेर परिसरातील १६
‘श्री’ बैठकीमार्फत ५४३ ‘श्री’ सदस्य कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते. त्यांनी ६.२३० टन ओला कचरा आणि ३.५५० कोरडा कचरा असा ९.७८० टन कचरा संकलित करण्यात येऊन तो पहाडीबाबा येथे डंपिंग ग्राऊंडमध्ये जमा करण्यात आला. महास्वच्छता अभियानात ४.७ कि.मी. दुतर्फा रोड स्वच्छ करण्यात आले. १ लाख ५९ हजार २०० स्वेअर मिटर परिसर शासकीय कार्यालय स्वच्छ केले. यशस्वीतेसाठी प्रशासनासह जनतेचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here