Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»Jalgaon : जळगावात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाचा कारवाई मोहीमेत १९ सिलिंडर जप्त
    Uncategorized

    Jalgaon : जळगावात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाचा कारवाई मोहीमेत १९ सिलिंडर जप्त

    saimatBy saimatMarch 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / जळगाव / प्रतिनिधी

    युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून, ग्राहकांकडून सिलिंडर वेळेत मिळत नसल्याची तक्रार होत आहे. तसेच, काही घरगुती सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाने धाडसत्र राबविले.

    गेल्या आठवडाभरात २८१ ठिकाणी धाडी टाकल्यानंतर घरगुती १९ सिलिंडरचा व्यावसायिक वापर स्पष्ट झाला असून, प्रशासनाने १८ हजार १३४ रुपये किमतीचे सिलिंडर जप्त केले आहेत. महसूल विभागाचे पथक ठिकठिकाणी हॉटेल, खानावळी व लहान व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा गैरवापर शोधत आहेत.

    जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने दि. १३ मार्चपासून गॅस कंपन्यांकडून उपलब्ध साठ्याचा दैनंदिन अहवाल घेणे सुरू केले असून, तीनही गॅस वितरण कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    दरम्यान, जळगाव शहरात एलपीजी गॅसची मागणी वाढली असून, गृहिणींच्या दैनंदिन स्वयंपाकावर याचा थेट परिणाम झाला आहे. पर्याय म्हणून घरगुती वापरासोबतच हॉटेल, खानावळी व लहान व्यावसायिकांनी इंडक्शनचा वापर वाढवला आहे. मात्र, वीजबिलाचा फटका आणि सातत्याने एजन्सीधारकांकडे विचारणा सुरू असल्यामुळे ग्राहकांना अडचणी निर्माण होत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    PM Modi Iran President Call : युद्धादरम्यान मोदींचा इराणच्या अध्यक्षांना फोन; तीन मुद्द्यांवर चर्चा

    March 21, 2026

    Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकाऱ्यांचा बारामतीत दुर्दैवी विमान अपघातात बळी

    January 28, 2026

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.