Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : रामनवमी उत्सवात जळगाव रंगणार ‘रामरंग’ भजन
    जळगाव

    Jalgaon : रामनवमी उत्सवात जळगाव रंगणार ‘रामरंग’ भजन

    saimatBy saimatMarch 25, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon will be filled with 'Ramrang' bhajans during Ram Navami festival
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित भजने व अभंगांची मेजवानी

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनवमीचे औचित्य साधून जळगाव शहरात ‘रामरंग : भक्तीचा आणि सुरांचा संगम’ या भव्य भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अयोध्यानगर येथील राममंदिर मित्र मंडळाच्या वतीने हा भक्तीमय स्वरसोहळा रंगणार आहे.

    औद्योगिक वसाहत परिसरातील अयोध्यानगर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात जळगावातील प्रसिद्ध ‘भक्तीनाद’ ग्रुपकडून भजन संध्याचे सादरीकरण केले जाणार असून, भक्ती आणि संगीताची सुंदर मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

    या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध भजन गायक पं. नारायणभाई ओझा आणि प्रसिद्ध गायिका भानूप्रियाजी यांचे सुमधुर गायन. प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित भजने, अभंग आणि भक्तिगीते त्यांच्या आवाजातून सादर होणार असल्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढणार आहे.

    कार्यक्रमाचे निवेदन कलावंत व लोकप्रिय निवेदक तुषार वाघुळदे हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर करणार असून, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला वेगळीच उठावदार छटा प्राप्त होणार आहे.

    रामजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष भजन संध्येत सहभागी होऊन प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन होण्याचे आवाहन आयोजकांनी सर्व रामभक्तांना केले आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तीमय सुरावटींचा आनंद घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    LPG gas : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले OTP व e-KYC अनिवार्य

    March 25, 2026

    Kolhapur : व्यापाऱ्याची कार अडवून अडीच लाखांची लूट; चार अज्ञात आरोपी पसार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.