Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : फक्त ५०० रुपयांसाठी तरुणाचा खून जळगाव हादरले, धारदार शस्त्राच्या हल्ल्यात नितीन काळेचा मृत्यू
    क्राईम

    Jalgaon : फक्त ५०० रुपयांसाठी तरुणाचा खून जळगाव हादरले, धारदार शस्त्राच्या हल्ल्यात नितीन काळेचा मृत्यू

    saimatBy saimatMarch 23, 2026Updated:March 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon shaken by murder of young man for just Rs 500, Nitin Kale dies in sharp weapon attack
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली; संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात, नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

    साईमत जळगाव   प्रतिनिधी

    शहरातील जैनाबाद परिसरात अत्यंत किरकोळ कारणावरून घडलेल्या खूनाच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. केवळ ५०० रुपयांच्या वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन नाना काळे (वय ३५) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने नितीन काळे याच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली होती. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. संतापाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने नितीनवर अनेक वार केले. हे वार इतके भीषण होते की त्यामध्ये नितीन काळे यांचे आतडे बाहेर येण्याइतकी गंभीर जखम झाली होती.

    घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत नितीन काळे यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त तैनात केला.

    या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित श्याम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

    दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी देखील संशयिताने नितीन काळे याच्याशी वाद घालत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली होती. मात्र, त्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला केवळ दोन दिवसांत सोडून दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच, पैसे घेऊन आरोपीला मोकळे सोडण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

    मयताचा भाऊ राजू काळे आणि नातेवाईक जितेंद्र सोनवणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    या धक्कादायक घटनेमुळे “केवळ काही रुपयांसाठी जीव घेण्यापर्यंत परिस्थिती कशी पोहोचते?” असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत असून, कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026

    Air India flights cancelled : इराण संघर्षामुळे एअर इंडियाचे २,५०० उड्डाणे रद्द; विमान कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला

    March 23, 2026

    Jalgaon : जळगावात ओबीसी जनगणनेसाठी भारत मुक्ती मोर्चा

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.