पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देवून गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गुरुंचा सन्मान सोहळा पोलीस मुख्यालयातील पद्मालय हॉलमध्ये नुकताच पार पडला. कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांसह शिक्षकेतर मान्यवरांना आमंत्रित केले होते. यावेळी डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रेश्मा अवतारे, स्टाफ, मानव संसाधन विभागाने केले होते. कार्यक्रमात पोलिसांसह उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करुन सकारात्मक चर्चा झाली.
सन्मानार्थींमध्ये गणपतराव पोळ, यजुर्वेद्र महाजन, डॉ. अनिल डोंगरे, अशोक कोतवाल, डॉ.वी.वाय रेड्डी, डॉ. गयाज उस्तानी, डॉ. धमेंद्र पाटील, डॉ. संजय हांडे, डॉ. अपर्णा भट, आरती गोरे, डॉ. अनिता पाटील, डॉ. यशवंत पाटील, योगेश करंदीकर, डॉ. इरफान शेख, मेघना राजकोटीया, ज्योती खानोरे, चंद्रकांत पाटील, अनिता चौधरी, सिस्टर मार्टल बेंझामीन, गोकुळ महाजन, प्रा. मिनाक्षी पाटील, प्रा. योगेश बोरसे, ऐश्वर्या परदेशी, रवींद्र पठार, प्रवीण पाटील, दिनेश लोढा, राजेंद्र ठोसरे, नरेंद्र भोई, प्रा. नारायण निळे, व्यंकटेश अय्यंगर, सुधाकर बेलसरे, सचिन पाटील, पद्मजा नेवे, डॉ. भारती काळे, प्रणाली, सिसोदीया, अविनाश जावळे, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते, प्रा. हेमराज पाटील, प्रा. जयंत जाधव, राजेंद्र जंजाळे, पो.ना. रज्जाक अली सैय्यद आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाला डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड, पोलीस उपअधीक्षक (गृह), राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, जळगाव उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन, शाखा प्रभारी अधिकारी यांच्यासह इतर पोलीस अंमलदार, नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सुत्रसंचालन अमित माळी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी मानले.