साईमत, जळगाव : प्रतिनिधी
क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव, एकलव्य क्रीडा संकुल, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय मनपा स्तरीय स्क्वॉश स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मु.जे.महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, मनपाचे क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, चेअरमन प्रा.शिल्पा सरोदे, प्रा.स्वाती बराटे, प्रा.डॉ.निलेश जोशी आदी उपस्थित होते.
उद्घाटन प्रत्यक्ष खेळून प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले. स्पर्धेत आठ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी ५३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पंच स्पर्धा प्रमुख म्हणून प्रा.प्रवीण कोल्हे, शुभम शिसोदे, अनिरुद्ध जाधव, गजानन खरात, कोमल पाटील, आशिष पाटील, नरेंद्र भोई, पवन चव्हाण यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ.रणजीत पाटील तर आभार प्रा.स्वाती बऱ्हाटे यांनी मानले.
