शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला मिळाला प्रतिसाद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महानगर शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात प्रतिभा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शिवसेना सदस्य नोंदणी अभियान, राजमालती नगर येथे वृक्षारोपण, पांझरा पोळ येथील गोशाळा येथे चारा आणि कुट्टीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महानगर प्रमुख संतोष पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, समन्वयक राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, उपमहानगरप्रमुख प्रमोद शिंपी, सागर पाटील, युवासेना उप महानगरप्रमुख सनी सोनार, वेदांत पाटील, शिवम सोनवणे, अमर राजपूत, राहुल पाटील, पंकज सोनवणे, नयन चव्हाण, दीपक सोनवणे, धीरज सोनार, दुर्गेश महाजन, निलेश कोळी, रोहित पवार, शिवम कस्तुरे, प्रथमेश पाटील, यश वानखेडे, कल्पेश सोनार, निखिल दहितडक, शुभम शिंदे, विशाल कोळी, मोहित राजपूत, चेतन चौधरी, संदीप पाटील, कल्पेश सोनार, सिद्धेश पाटील, बंटी बनसोडे, बंटी पाटील, धीरज पाटील. यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.