Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जळगाव महापौर-उपमहापौरांचा आदेश कचरा हस्तांतरणाचे काम नियोजित ठिकाणी हलवा
    जळगाव

    Jalgaon : जळगाव महापौर-उपमहापौरांचा आदेश कचरा हस्तांतरणाचे काम नियोजित ठिकाणी हलवा

    saimatBy saimatFebruary 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Jalgaon Mayor-Deputy Mayor orders to shift waste transfer work to planned location
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शैक्षणिक परिसरात कचरा हस्तांतरण थांबवला; महापौरांचा कडक निर्णय

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरातील शैक्षणिक परिसरात सुरू असलेल्या कचरा हस्तांतरणामुळे निर्माण झालेल्या तीव्र दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण बाधित होत असल्याची गंभीर परिस्थिती महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी परिसरातील कचरा हस्तांतरणाचे काम त्वरित बंद करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव परिसर, महिलांचे वसतिगृह आणि शेजारील महाविद्यालय तसेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक समोरील भागात लहान कचरा गाड्यांमधील कचरा मोठ्या गाड्यांमध्ये भरला जात होता. हे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. नागरिक आणि विद्यार्थी यांना आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त झाली होती. तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्या होत्या.

    महापौर आणि उपमहापौरांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी परिसरातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तात्काळ बोलावून स्पष्टीकरण मागितले.

    महापौरांनी स्पष्ट केले की, कॉलेज परिसरातील कचरा हस्तांतरणाचे काम तातडीने बंद करावे आणि हे काम शहरातील नियोजित ठिकाणी हलविण्याचे आदेश दिले आहेत. “विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने कचरा व्यवस्थापन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

    या पाहणीवेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. महापौरांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे परिसरातील वातावरण लवकरच शैक्षणिक अनुकूल बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026

    Jalgaon : महानगरपालिकेत उत्कृष्ट महिला कर्मचारी, बचत गट आणि विद्यार्थ्यांचा सत्कार

    March 8, 2026

    Pahur : पहूर येथे घरफोडीची धक्कादायक घटना दीड लाखांचा ऐवज लंपास

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.