साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र ॲम्युचेअर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने नेटबॉल खेलकुद युवा असोसिएशन, नंदुरबारच्यावतीने ६ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या १६ व्या राज्यस्तरीय सबज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे मुला-मुलींचे दोन्ही संघ सहभागी होणार आहे. यासाठी जळगाव जिल्हा निवड चाचणी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलच्या नेटबॉल मैदानावर रविवारी, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे. ८ ऑक्टोबर २००७ नंतर जन्मलेले खेळाडू चाचणीत सहभागी होवू शकतील. सहभागासाठी आधार कार्ड झेरॉक्स, ३ पासपोर्ट फोटो, बोनाफाईड, जन्माचा दाखला आदी कागदपत्रांसह जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा नेटबॉल असोसिएशनचेे सचिव प्रमोद पाटील यांनी केले आहे.
खेळाडूंची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्यावतीने निवड चाचणीसाठी अध्यक्ष तथा आ.सुरेश दामू भोळे, उपाध्यक्ष खा. उमेश पाटील, संचालक परमानंद सूर्यवंशी, मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी, मार्गदर्शक एम.वाय.चव्हाण, सचिव प्रमोद पाटील (९८३४६८००६५), क्रीडाशिक्षक योगेश पांडे (९१७५९२३३२५) यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
