protest at the treasury office : जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन

0
9
(c)Kaushik K Shil +919903371497

सर्व बिले मंजुरीनंतर वेतन खात्यावर जमा, आंदोलन घेतले मागे

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे नियमित पगार बिल प्रलंबित होते. त्यामुळे जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, कोषागार कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाबाबत प्रचंड खेद व्यक्त करण्यात आला. कोषागार अधिकाऱ्यांनी तातडीने त्याचवेळी सर्व बिले मंजूर केली. त्यानंतर वेतन खात्यावर जमा झाल्याचे मॅसेज आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. हे आंदोलन एस.डी.भिरुड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

सुरवातीला शालार्थ आय डी घोटाळा चौकशीच्या नावाखाली काही दिवस वेतन पथक ट्रेझरीला बिल सादर करत नव्हते. संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वेतन पथकाने बिल सादर केले. परंतु मार्च महिन्यात वेतन पथकाने सादर केलेले बिल मिस मॅच अकाऊंट नंबरमुळे प्रलंबित होते. त्याकडे वेतन पथकाने दुर्लक्ष केले. अशा प्रलंबित बिलामुळे एप्रिल महिन्याचे बिल सिस्टीम स्विकारत नव्हती. ही अडचण राज्य पातळीवरुनच सोडविता येणार होती. याबाबत कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी प्रयत्न केले.

आंदोलनकर्त्यांनी वेतनासाठी घेतली ठाम भूमिका

संघटनेने पदवीधर आ.सत्यजित तांबे यांच्याशी संपर्क साधून अडचण दूर करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून अडचण सोडविण्यात आली. मात्र, अडचण दूर होऊनही कोषागार कार्यालयातील दिरंगाई आणि अडवणुकीमुळे वेतन बील मंजूर होत नव्हते. म्हणून जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने जिल्हा कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. वेतन खात्यावर जमा झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

आंदोलनात यांचा होता सहभाग

आंदोलनात प्रा.सुनील गरुड, डॉ.अतुल इंगळे, बाळासाहेब पाटील, राजेश जाधव, प्रशांत कोल्हे, प्रवीण पाटील, अरुण सपकाळे, एस.के.पाटील, एन.ओ.चौधरी, प्रदीप वाणी, गोपाळ पाटील, गोपाळ महाजन, डॉ.रणजीत पाटील, प्रा.समीर घोडेस्वार, प्रा. दिलराज पाटील, प्रा.शशिकांत पाटील, सारंग जोशी, साहेबराव बागुल, चंद्रकांत कोळी, किरण पाटील, दिनेश पाटील, मनोज वाघ, गजानन किरंगे, एन.बी.पाटील, सचिन माळी, विलास पाटील आदींचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here