Supplementary Exam Results : जळगाव जिल्ह्याचा दहावीसह बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

0
22

दहावीचा ६४.८२ तर बारावीचा ४९ टक्के लागला निकाल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या दहावीसह बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी, २९ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. जून-जुलै २०२५ या कालावधीत परीक्षा पार पडली होती.

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातून ७४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशाचे प्रमाण ६४.८२ टक्के इतके आहे. हे निकाल विभागात सर्वाधिक टक्केवारीपैकी एक मानले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये समाधानकारक वातावरण आहे.

विद्यार्थ्यांना संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

बारावीच्या पुरवणी परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून ५६७ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी २७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. निकालाची टक्केवारी ४९.०२ टक्के इतकी आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी बारावीचा निकाल स्थिर आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा चांगला उपयोग करून घेतला आहे. दहावीच्या निकालासाठी https://www.mahahsscboard. in, https://sscresult.mkcl.org, बारावीच्या निकालासाठी https://www.mahahsscboard.in, https://hscresult.mkcl.org अशा संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here