साईमत जळगाव प्रतिनिधी
महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन ध्वजवंदना करुन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास अधिक्षक अभियंता अनिल महाजन यांच्यासह परिमंडल, मंडल आणि विभागीय कार्यालयातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.