Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगावसह यावल तहसिलदारांची अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर बेधडक कारवाई
    क्राईम

    जळगावसह यावल तहसिलदारांची अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर बेधडक कारवाई

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, यावल : प्रतिनिधी

    जळगाव आणि यावल तहसीलदार यांच्या संयुक्तिक पथकाची एकाच दिवशी, एकाच वेळेला शेळगाव बॅरेजजवळ बेकायदा अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन एक जेसीबी मशीन आणि वाळूने भरलेले एक डंपर यावलच्या तहसील कार्यालयात जमा केले. तसेच त्यातील दोन्ही वाहनांवरील वाहन चालक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत फरार झाल्याची माहिती यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडून मिळाली. ही बेधडक कारवाई मंगळवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याने अवैध गौण खनिज वाहतुकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

    जळगाव आणि यावल तालुक्याच्या हद्दीवर तापी नदीवरील शेळगाव बॅरेज परिसरातून तापी नदीपात्रातून विनापरवाना अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून सर्रासपणे वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर तसेच जळगावच्या तहसीलदार यांनी संयुक्तपणे पोलीस आणि महसूल पथकाच्या सहाय्याने रात्रीच्या वेळेस अचानक धाड टाकून घटना स्थळावरून एक जेसीबी मशीन आणि वाळूने भरलेले एक डंपर ताब्यात घेऊन यावल तहसील कार्यालयात दोन्ही वाहन जप्त केले. जेसीबी आणि डंपरवरील चालक मात्र फरार झाले.

    शेळगाव बॅरेज परिसरातून जळगाव आणि यावल तालुका हद्दीतून दररोज अवैध गौण खनिजाची वाळू व पिवळी माती वाहतूक (नदीतील गाळ वाहतूक नावाखाली) चोरट्या मार्गाने सर्रासपणे बोरावल, भालशिव, टाकरखेडामार्गे यावल तालुक्यात तसेच शेळगाव, भादली, आसोदा परिसरातून जळगाव तालुक्यात सर्रासपणे वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यामुळे आज प्रथमच जळगाव आणि यावलच्या तहसीलदार यांनी संयुक्तपणे कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात अवैध गौण खनिज कारवाईत सातत्य राहणार असल्याचे महसूल व पोलीस विभागात चर्चिले जात आहे. ही कारवाई केल्याची माहिती यावल महसूल विभागाकडून मिळाली.

    जळगाव आणि यावल तालुका महसूल विभाग आपल्या कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनधारक मालक, चालक यांची माहिती पूर्ण नाव, गाव, पत्त्यासह वाहन नंबरसह तसेच त्याचे कोणते कोणते उद्योगधंदे आणि कोणाच्या प्रभावाखाली कोणाशी संबंधित राहून बेकायदा व्यवसाय करीत आहे आणि त्या वाहनांची नोंदणी आरटीओकडे अधिकृतरित्या केली आहे किंवा नाही? किंवा ती वाहने कुठून आणलेली आहेत? त्याची माहिती संकलित करून यापुढे पोलीस बंदोबस्तात कडक कारवाई करणार असल्याचे समजले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.