जैन चॅलेंज ट्रॉफी रुस्तमजी स्कूल व साने गुरुजी विद्यालय विजयी

0
77

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथे जैन इरिगेशन सिस्टीम लि संचालित जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे १६ वर्षा खालील २१ वी जैन चॅलेंज ट्रॉफी स्पर्धा ०८ जानेवारी पासून अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचा उद्घाटन व नाणेफेक जैन फॉर्म फ्रेश चे संचालक अथांग जैन यांचे हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, हेड कोच सुयश बुरकुल, घनश्याम चौधरी, मोहंमद फजल उपस्थित होते व सूत्र संचालन वरून देशपांडे यांनी केले.

पहिला सामना रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल व पोतदार इंटरनॅशनल स्कूल यांच्या दरम्यान खेळण्यात आला नाणेफेक जिंकून पोतदार इंटरनॅशनल स्कूल संघाने सर्व गडी बाद २४.५ षटकात ११४ धावा केल्या त्यात शुर्या महेता ४५ चेडुंत २७ व शिवाजी चौधरी २५ चेंडूत २४ धावा केल्या गोलंदाजीत रुस्तमजी स्कूल तर्फे आर्व तोडकरी ३ व सोहम जैन यांनी २ गडी बाद केले प्रतिउत्तरात रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल संघाने २१ षटकात ५ गडी बाद ११६ धावा करून हा सामना ५ गडी राखून विजय मिळवला त्यात जैनम जैन ६२ चेंडूत ३८ व सोहम जैन ३९ चेंडूत ३५ धावा केले गोलंदाजीत पोतदार तर्फे शूर्य मेहता दर्शन हारणे प्रत्येकी २ गडी बाद केले . हा सामन्यांत सोहम जैन सामनावीर ठरला.

दुसरा सामना साने गुरुजी विद्यालय अमळनेर व किड्स गुरुकुल इंग्लीश स्कूल यांच्या दरम्यान खेळविण्यात आला प्रथम फलंदाजी करत साने गुरुजी विद्यालयाने संघाने २५ षटकात ७ गडी बाद १५८ धावा केल्या त्यात अथर्व शिंदे ६३ चेंडूत ५७ धावा व यशराज पाटील ३२ चेंडूत ४२ धावा केले गोलंदाजीत किड्स गुरुकुल तर्फे प्रणव पटेल ३ व राज लढ्ढा २ गडी बाद केले प्रतिउत्तरात किड्स गुरुकुल संघाने सर्व गडी बाद १३८ धावा केल्या त्यात अक्षय खुराणा २६ व पर्व जैन १९ आणि राज लढ्ढा १८ धावा केल्या गोलंदाजीत दर्शन पाटील ३ व राज जैन आणि वेधांशू कुवर प्रत्येकी २ गडी बाद केले आणि हा सामना साने गुरुजी संघाने २० धावांनी जिंकला अथर्व शिंदे या सामन्यात सामनावीर ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here