जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शहरातील प्रेम नगरातील रहिवासी तथा ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जाणारे जगदीश बाबुराव सोनार यांची भाजपाच्या जामनेर शहर मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांची निवड भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ देण्यासाठी केली असल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. तसेच भाजपाचे जामनेर शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे यांच्या स्वाक्षरीने पत्र जगदीश सोनार यांना प्राप्त झाले आहे. त्यांची निवड पक्षाकडून नुकत्याच जाहीर केलेल्या नूतन कार्यकारिणीत केली आहे.
नियुक्ती पत्र देतेवेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम, जितेंद्र पाटील, पं.स.चे माजी सभापती चंद्रशेखर काळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
आरोग्य सेवा क्षेत्रात जगदीश सोनार यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. अनेक गरजू रुग्णांना मदत करून ‘आरोग्यदूत’ तसेच मंत्री गिरीष महाजन यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे पक्ष संघटनेसाठी काम अविरत सुरु असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बळकटीवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.