Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»फुलगावच्या सरपंचावर आली उपोषणाची वेळ, सोमवारपासून उपोषण
    भुसावळ

    फुलगावच्या सरपंचावर आली उपोषणाची वेळ, सोमवारपासून उपोषण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ग्रामसेवकांवर राजकीय दबाव ? विकास कामांना बसतोय खोडा

    साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :

    तालुक्यातील आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झालेल्या फुलगाव येथील ग्रामपंचायतीच्या कारभारातील राजकारण तापले असुन अपक्ष असलेले लोकनियुक्त सरपंचावर उपोषणास बसण्याची वेळ आली आहे. यामध्ये त्यांनी वर्षभराच्या कालावधीत राजकीय दबावापोटी तीन ग्रामसेवकांची बदली झाली आहे. गावातील विकास कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कारण स्पष्ट करीत आजपासून ग्रामपंचायतमध्ये उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परिसरात फुलगाव ग्रामपंचायतमधील राजकारणाचा विषय चर्चेचा ठरत आहे.

    तालुक्यातील माजी सैनिकांचे तसेच आदर्श गाव पुरस्कार प्राप्त असलेल्या फुलगांवच्या ग्रामपंचायतीचे राजकारण मागीलवर्षी झालेल्या निवडणुकीनंतर चांगलेच तापले आहे. मागीलवर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले शाम फुलगांवकर यांनी भाजप प्रणीत सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव करीत सरपंच पदावर विराजमान झाले. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या विरोधी गटातील सदस्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे राजकीय द्वेषापोटी ग्रामपंचायतीमध्ये वर्षभराच्या कालावधीत तीन वेळा ग्रामसेवकाची झाली आहे.

    फुलगावातील राजकारण ठरले चर्चेचा विषय

    ग्रामपंचायतीच्या कारभारात अप्रत्यक्षपणे राजकीय हस्तक्षेप, ग्रामविकासात राजकीय षडयंत्र, राजकीय षडयंत्रामुळे आदर्श गावात घाणीचे साम्राज्य, ग्रामविकासाला बसत असलेला खोडा, ग्रामसेवक यांचेवर दबाव टाकुन झालेल्या ग्रामविकास कामांची रक्कम अदा करण्यास होत असलेला विरोध, राजकीय षडयंत्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग अशा विविध कारणांनी गावाचा विकासात खोडा निर्माण होत असल्याच्या कारणावरून अपक्ष लोकनियुक्त सरपंच शाम फुलगांवकर यांनी आजपासून ग्रामपंचायतमध्ये उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले असल्याची माहिती दिली आहे. आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झालेल्या फूलगावच्या लोकनियुक्त अपक्ष सरपंचावरच उपोषणाची वेळ आली असल्याने तालुक्यात फुलगावातील राजकारण चर्चेचा विषय ठरत आहे.

    यापूर्वीही केले होते उपोषण

    तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य असलेले शाम फुलगावकर यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ५ एप्रिल २०२३ मध्ये सलग आठ दिवस उपोषण केले होते. यावेळी त्यांना ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याने माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी उपोषण स्थळी भेट देवून आ.संजय सावकारेच ठेकेदार होत असल्याने भ्रष्ट्राचार वाढत असल्याचा आरोप केला होता. याबाबत सोशल मीडियावर चांगलाच कलगीतुरा रंगला होता. उपोषणकर्ते शाम फुलगावकर हे अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनावर ठाम असल्याने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतरच त्यांनी आठ दिवसानंतर आपल्या उपोषणाची सांगता केली होती. यावेळीही तालुक्यात फुलगाव चांगलेच चर्चेत आले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.