आणीबाणी लागू करणारेच आता संविधान धोक्यात असल्याचा गैरप्रचार करताहेत : आ.संजय सावकारे

0
18

साईमत/ न्यूज नेटवर्क । भुसावळ।

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात देशाच्या घटनेविरोधात जाऊन आणीबाणी लागू केली होती. त्या माध्यमातून त्यांनी देशातील जनतेच्या हक्कांवर गदा आणली होती. आणीबाणी लागू करणारेच विरोधक आता हातात संविधान घेऊन जनतेला भूलथापा देऊन देशाचे संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करीत असल्याचे प्रतिपादन आ.संजय सावकारे यांनी केले. आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आभार मानून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागामुळेच भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण देशासह राज्यात सत्तेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते.

प्रत्येकवर्षी भाजपकडून दिवस काळादिन म्हणून पाळण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी भुसावळ भाजपतर्फे आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या दिलीप ओक, अरुण भावसार, रवींद्र पवार अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. आणीबाणी काळात सहन केलेल्या हालअपेष्टाबद्दल कथन केले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, प्रमोद सावकारे, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, पिंटू ठाकूर, किरण कोलते, विस्तारक रमाशंकर दुबे, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, आनंद ठाकरे, शेखर धांडे, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रवीण इखणकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, अनिरुद्ध कुलकर्णी, बीसन गोहर, महिला मोर्चाच्या शैलेजा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.वसंत झारखंडे, कैलास महाजन, कैलास शेलोडे, संजय भिरुड, भैय्या महाजन, विशाल जंगले, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष राहुल तायडे, धनराज बाविस्कर, राजू खरारे, जयंत माहुरकर, शंकर शेळके, शेखर धांडे, प्रशांत देवकर, सुमित बऱ्हाटे, वैभव लोणारी, कुणाल येवले, आशिष पटेल, अनिल पाटील, अल्बर्ट तायडे, शिशिर जावळे, सचिन बऱ्हाटे, वेदप्रकाश ओझा, गोपी राजपूत, दर्शन चिंचोले, यशांक पाटील, दीपक सोनवणे, भुरा खंडारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here