श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होणे केव्हाही चांगले : श्याम चैतन्य महाराज

0
16

साईमत/ न्यूज नेटवर्क/जामनेर :

विद्यार्थ्यांनी भविष्यात संस्काराच्या माध्यमातून यशाची शिखरे गाठावीत. अचूक नियोजनातून ध्येय संपादित करावे, याच वेळेला स्व. वसंतराव नाईक यांनी ज्या पद्धतीने गोरगरिबांची,वंचित, दुर्बल, आदिवासी घटकांची सेवा केली. अगदी त्याचप्रमाणे समाजासह देशाची सेवा करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य संस्काराच्या माध्यमातून भविष्याची वाटचाल करावी. कारण श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होणे केव्हाही चांगले असते, असा उपदेश गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी दिला.

जामनेर येथील वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने बंजारा समाजातील दहावी, बारावी, नीट, सीईटी, स्कॉलरशिप व पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुणगौरव सोहळा वाकी रस्त्यालगतच्या जि.प.केंद्रीय शाळेत घेण्यात आला. त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.बी.धाडी होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर संच, पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यांची होती उपस्थिती

यावेळी भारमल नाईक, सहसचिव रोहिदास पवार, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल जाधव, तालुकाध्यक्ष बन्सीलाल चव्हाण, जळगाव तालुकाध्यक्ष विनोद राठोड, सचिव गजानन चव्हाण, भडगाव तालुकाध्यक्ष एम.आर.राठोड, युवा जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण, सुभाष नाईक, गोकुळ महाराज, भानुदास चव्हाण, डॉ. प्रकाश चव्हाण, नटवर चव्हाण उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी बन्सीलाल चव्हाण, विठ्ठल जाधव, जितेंद्र नाईक, पुखराज पवार, गणेश राठोड, रमेश चव्हाण, रोहिदास पवार, अशोक पवार, ग्रामसेवक चिंतामण राठोड, खेमराज नाईक, प्रकाश चव्हाण, सुदाम चव्हाण, सुभाष राठोड, प्रदीप जाधव, तुकाराम राठोड, चिंतामण राठोड यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक विठ्ठल जाधव, सूत्रसंचालन खेमराज नाईक तर आभार महेंद्र नाईक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here