इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची शिक्षक कृती समितीने घेतली भेट

0
6

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यात वैज्ञानिक गोष्टींचा प्रचार, प्रसार व्हावा या पार्श्‍वभूमीवर येथील उपक्रमशील शिक्षक कृती समितीने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची नुकतीच भेट घेऊन तालुक्यात होत असलेल्या विज्ञानाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी तालुक्यात होत असलेल्या वैज्ञानिक उपक्रमाचे कौतुक केले.

रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. चंद्रमौली जोशी, इस्त्रोचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत जोशी हे रेल्वेने अहमदाबादकडून जळगावकडे जात होते. यावेळी अमळनेर रेल्वे स्टेशनवर दोन्ही शास्त्रज्ञांचे कृती समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले. कृती समितीत तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए.धनगर, विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, गणित शिक्षक ए.बी.धनगर, सदस्य नेहा पाटील तसेच इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे उमेश काटे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशनमार्फत सुरू असलेले विविध उपक्रम, वावडे येथील बी.बी.ठाकरे हायस्कुलमध्ये सुरू असलेल्या डॉ. कलाम चाइल्ड सायंटिस्ट सेंटरची वाटचाल, आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्या संकल्पनेतून मारवड विकास मंच व ‘मिलके चलो असोसिएशन’ यांच्यामार्फत सुरू असलेली डॉ.कलाम फिरती प्रयोगशाळा तसेच भविष्यातील विविध योजना विषयी दोन्ही शास्त्रज्ञांनी माहिती जाणून घेतली. इस्त्रोची शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी असलेली शैक्षणिक सहल तसेच रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे कार्य पाहण्यासाठी दोन्ही शास्त्रज्ञांनी आमंत्रित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here