Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»देश-विदेश»इस्रायलचा बैरुतवर भीषण हवाई हल्ला; हेझबोला प्रमुखाचा सल्लागार ठार, युद्धविरामाला फाशी
    देश-विदेश

    इस्रायलचा बैरुतवर भीषण हवाई हल्ला; हेझबोला प्रमुखाचा सल्लागार ठार, युद्धविरामाला फाशी

    saimat teamBy saimat teamApril 9, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    साईमत वृत्तसेवा

    बैरुत: इस्रायलने (Israel) लेबनॉनच्या (Lebanon) राजधानी बैरुतमध्ये (Beirut) बुधवारी रात्रभर हवाई हल्ले (airstrike) करून हेझबोला प्रमुख नईम कासिमचा वैयक्तिक सल्लागार अली युसूफ हर्शी ठार केले असल्याचा दावा आयडीएफने केला आहे. हा हल्ला इराण- अमेरिका युद्धविरामानंतरही सुरू राहिल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव पुन्हा वाढल्याचे निर्देशित झाले आहे.

    इस्रायली लष्कराच्या (IDF) टेलिग्राम निवेदनानुसार, हर्शी हा नईम कासिमचा अत्यंत जवळचा सहकारी आणि वैयक्तिक सल्लागार होता. हेझबोला प्रमुखाच्या कार्यालयाचे व्यवस्थापन पाहण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. हल्ल्यात लिटानी नदीच्या उत्तर ते दक्षिण भागातील दोन महत्त्वाच्या क्रॉसिंगवरही कारवाई करण्यात आली, जिथून शस्त्रे, रॉकेट्स आणि लाँचर्स वाहतूक केली जात होती.

    याशिवाय, दक्षिण लेबनॉनमधील हेझबोला दहशतवाद्यांकडून वापरली जाणारी जवळपास १० शस्त्रास्त्र साठवणूक ठिकाणे, लाँचर्स आणि कमांड सेंटर्सना ही लक्ष्य करण्यात आले. इस्रायली लष्कराने सांगितले की, बैरुतमधील हल्ल्यात हेझबोलाचे १०० हून अधिक कमांड सेंटर्स आणि लष्करी तळांना लक्ष्य केले गेले.

    इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या युद्धविरामानंतरही इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवले, ज्यावर पंतप्रधान नेतान्याहू यांनी युद्धविराम लेबनॉनसाठी लागू नसल्याचा दावा केला आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षांनंतर हा हल्ला सर्वात मोठा मानला जात आहे.

    या घटनेमुळे मध्य पूर्वेत तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

    IDF अली युसूफ हर्शी इस्रायल नईम कासिम नेतान्याहू बैरुत मध्य पूर्व संघर्ष युद्धविराम लेबनॉन हवाई हल्ला हेझबोला
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    ४० दिवसांच्या युद्धानंतर सीजफायर; हजारो मृत्यू, अब्जावधींचे नुकसान—जग हादरले, भारतालाही मोठा फटका

    April 8, 2026

    America : अमेरिकेचा धक्कादायक इशारा! इराण नंतर ट्रम्पचा लक्ष्य क्यूबा; जगभरात चिंता वाढली

    April 3, 2026

    US Israel Iran war : इराणच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता; पश्चिम आशियात भारताचे २२ जहाजे अडकली

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.