तालुक्यासह जिल्ह्यात लवकरच सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होणार

0
38

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर :

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मित्र पक्षांसह भाजपच्या विरोधात खोटे आरोप करण्यात आले. शिवाय विरोधकांनी निवडणुकीत जनतेला वारेमाप आश्वासन दिले होते, जे कधीच पूर्ण होणार नव्हते. तसेच विरोधकांनी सर्व जंग-जंग पछाडुनही नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात तालुक्यासह जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले. शहरातील शिवाजी नगर लगतच्या एकलव्य शाळेच्या आवारात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर अजय भोळे, चंद्रकांत बाविस्कर, संजय गरुड, प्रदीप लोढा, दिलीप खोडपे, जे.के.चव्हाण, नाना पाटील, शेख अनिस, नाजीम पार्टी, आतीष झाल्टे, डॉ.प्रशांत भोंडे, तुकाराम निकम, गोविंद अग्रवाल, प्रा.शरद पाटील, कैलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, बोदवड उपसा सिंचन योजना, भागपूर अशा महत्वाकांक्षी योजना काही कारणास्तव संथगतीने सुरू आहेत. बहुतांश सिंचन प्रकल्प, पाचोरा ते बोदवड रेल्वे मार्ग आदींसाठीची कामे लवकरच सुरू करण्यात येतील. आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांसह राज्यातील सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासाच्या जोरावर महायुती बहुमताचा आकडा पार करणार असल्याचा विश्वासही मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.

यांचीही झाली समयोचित भाषणे

मेळाव्यात अजय भोळे, प्रा.शरद पाटील, चंद्रकांत बाविस्कर, गोविंद अग्रवाल आदींची समयोचित भाषणे झाली. मुख्यमंत्री “लाडकी बहीण” योजनेबाबत वक्त्यांनी आपल्या संबोधनात विस्तृत माहिती दिली. मेळाव्याला मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचालन मयूर पाटील तर रवींद्र झाल्टे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here