माजी ‘रॉ’ प्रमुख ए. एस. दुलत म्हणतात, “इराण युद्ध हरणार नाही, भारताने योग्य भूमिका घेतली पाहिजे”; २० दिवसांतील संघर्षात २,०००+ जणांचा बळी
साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी
माजी भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ (R&AW) प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करत, भारताने इराणच्या बाजूने उभे राहणे योग्य असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, “इराणने नेहमीच भारताच्या पाठीशी साथ दिली आहे, त्यामुळे आपणही इराणच्याच सोबत राहिले पाहिजे. हे युद्ध इराण हरणार नाही.”
१. सध्याचे युद्ध आणि बळी: २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांमधील अमेरिकी लष्करी तळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केले. गेल्या २० दिवसांत २,००० हून अधिक जणांचा बळी गेला आहे.
२. नागरिकांचा बळी आणि भारतीय घटक: इराणच्या दाव्यानुसार इस्रायल-अमेरिका हल्ल्यात १,३००+ नागरिक ठार झाले, लेबनॉनमध्ये ९००+ मृत्यू. या हल्ल्यात दोन डझनाहून अधिक इस्रायली, अमेरिकन व अरब नागरिकांचा मृत्यू झाला असून, दुर्दैवाने दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, एक बेपत्ता आहे.
३. भारताचे जहाजे अडकली: अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे भारताचे २२ जहाजे हॉर्मुझ सामुद्रधुनीत अडकली आहेत. यावर १६.७ लाख टन कच्चे तेल, ३.२ लाख टन एलपीजी व सुमारे २ लाख टन एलएनजी आहे. शिपिंग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा म्हणाले, “सर्व ६११ खलाशी सुरक्षित आहेत.”
