Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गोजोरेत घरफोडी करणारे गुन्हेगार अटकेत
    क्राईम

    गोजोरेत घरफोडी करणारे गुन्हेगार अटकेत

    SaimatBy SaimatAugust 18, 2023Updated:August 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

    भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोने- चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबवणाऱ्या चार संशयिताना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून इतर चोरीचा एकूण १० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत इतर चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी दुपारी ३ वाजता दिली.

    गोजोरे येथील मालतीबाई अभिमान चौधरी (वय ५७) ह्या घराला कुलूप लावून पुण्याला गेलेल्या होत्या. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले होते. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक मदत व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याचाा शोध घेणे सुरू केले. तसेच गावात बैठका घेऊन गावाची सुरक्षा घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व गावात रात्रीची ग्रस्त घालण्यात आली.

    दरम्यान १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दुचाकीवर तीन जण संशयितरित्या फिरत असताना दिसून आले. गावकऱ्यांनी तिघांना ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मधील आणि ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एकाची ओळख पटली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. संशयित आरोपी रवी प्रकाश चव्हाण (वय१८) रा. शबरीनगर, तांबपुरा जळगाव, जुनेद उर्फ मुस्तकीन शहा भिकन शहा (वय २२) रा. तांबापुरा आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा तिघांना ताब्यात घेतले आहे.

    संशयितांवर असे आहेत गुन्हे दाखल

    यातील संशयित आरोपी रवी चव्हाण यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ तर रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर जुनेद उर्फ मुस्तकीन शहा भिकन शहा याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी या शहरातील सोन्याच्या दागिन्यांची विल्हेवाट त्यांचा साथीदार गुरुदयालसिंग मनजितसिंग टाक याने गुजरातमध्ये जाऊन लावली होती. गुरूदयासिंग टाक यांच्यावर देखील चोरीचे गुन्हे दाखल आहे. दरम्यान पोलिसांनी या चौघांकडून रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने असा एकूण १० लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

    यांनी केली कारवाई
    ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, संजय तायडे, युनिक शेख, दीपक जाधव, प्रेमचंद सपकाळे, धीरज मंडलिक, सादिक शेख, राजीव काझी, उमाकांत पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे जगदीश भोई, प्रशांत चव्हाण यांनी कारवाई केली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : अज्ञात वाहनाच्या धडकेत ७० वर्षीय वृद्ध महिलेचा दुदैवी मृत्यू

    March 29, 2026

    Jalgaon : जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई तिघे जेरबंद

    March 29, 2026

    Chalisgaon : शिवापूर शिवारात दुहेरी आत्महत्येची दुर्दैवी घटना

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.