साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी (करण शिंदे)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २१ नोव्हेंबर २०२१ घेतलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (महाटीईटी)अंतरिम निकाल काल जाहीर करण्यात आला आहे.
उमेदवारांना हा पेपर पहिला (इयत्ता १ली ते ५ वी गट) व पेपर दुसरा (इयत्ता ६वी ते ८वी गट) परिक्षेचा निकाल काल सायंकाळी ५ वाजेपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या हींींिी://ारहरींशीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
ज्या उमेदवारांना गुणपडताळणी करायची असेल त्यांनी आपल्या लॉगइनमधून ५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. अन्य पध्दतीने विनंती किंवा नोंदणी मान्य केली जाणार नाही. ज्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत त्यांनी ५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने आपले निवेदन ारहरींशीं२१.ाीलशऽसारळश्र.लेा या ई-मेलवर पाठवावे. त्यानंतर आलेल्या व ई-मेल व्यतिरीक्त अन्य पध्दतीने आलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पात्र उमेदवारांना त्यांची प्रमाणपत्रे संबंधित जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि मुंबईत शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत पाठविण्यात येणार आहेत.
—