साईमत जळगाव प्रतिनिधी
केसीई सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात ‘आंतरमहाविद्यालयीन टेबल-टेनिस स्पर्धा’ उस्ताहात झाली. यात पुरुष आणि महिला गटात जळगाव विभागातील एकूण १० महाविद्यालयातील संघ सहभागी झाले.
याप्रसंगी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ झोपे, प्रमुख अतिथी डॉ. के. बी. महाजन (विभाप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, मू. जे. महाविद्यालय), तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते.
पुरुष गटात रायसोनी महाविद्यालय प्रथम, धनाजी नाना महाविद्यालय द्वितीय, नाहाटा महाविद्यालय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले, तर महिला गटात मू. जे. महाविद्यालय प्रथम, नाहाटा महाविद्यालय द्वितीय, पी.जी.महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. पी.जी.महाविद्यालयच्या विद्यार्थिनी जयश्री महाजन व पायल सोनवणे यांची याप्रसंगी जळगाव विभाग टेबल टेनिस संघात निवड करण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जैवतंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख तथा महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक डॉ. सारंग बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य क्रीडा संकुल व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.