पारोळा महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन खो-खो, कबड्डी स्पर्धा उत्साहात

0
16

साईमत, पारोळा : प्रतिनिधी

क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव अंतर्गत, एरंडोल विभागा क्रीडा समितीतर्फे आंतरमहाविद्यालयीन खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथे केले होते. स्पर्धेचे उद्घाटन पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक रोहन मोरे, प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील, उप-प्राचार्य डॉ. अजय पाटील, एरंडोल विभागाचे सचिव डॉ.विजय पाटील, डॉ.शैलेश पाटील, डॉ. देवदत्त पाटील, डॉ.हर्ष सरदार, डॉ. क्रांती वाघ, डॉ. सचिन पाटील, प्रा.जे.बी.सिसोदिया आदी उपस्थित होते.

स्पर्धामध्ये कबड्डी खेळात प्रताप महाविद्यालय अमळनेर मुलांचा संघ विजयी तर उपविजेता एन.वाय.एन.सी.महाविद्यालय चाळीसगाव, मुलींमध्ये आर.एन डी. भडगाव महाविद्यालय विजयी तर उपविजेता डी.डी.एस.जी.कॉलेज, चोपडा तसेच आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये प्रताप महाविद्यालय विजयी तर उपविजेता डी.डी.एस.जी. महाविद्यालय, चोपडा तर मुलींमध्ये आर.एन.डी.महाविद्यालय, भडगाव विजयी तर उपविजेता चोपडा महाविद्यालय ठरले.

स्पर्धेत पारोळा, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, भडगाव, बांभोरी, मारवाड, पाचोरा येथील संघ उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणून प्रा. किशोर वाघ, डॉ.शैलेश पाटील, डॉ. देवदत्त पाटील, डॉ. संजय भावसार, प्रा.प्रेमचंद चौधरी, डॉ.हर्ष सरदार, डॉ.विजय पाटील, रोहीत सपकाळे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार, उत्तम आमले, जयराम महाजन, गौतम जावळे यांच्यासह सर्व खेळाडूंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here