यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात
साईमत/यावल/प्रतिनिधी :
यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक शुक्रवारी, २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील होते. बैठकीला रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, जळगाव लोकसभा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, जळगाव महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी म्हणून उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी तालुक्याचा आढावा घेतला. आगामी काळात पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच रावेर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्यांना आश्वासन दिले. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. बुथ सक्षमीकरण करण्याचे आश्वासन वरिष्ठांना दिले. कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा कार्याध्यक्ष यांचे यावल तालुक्याच्यावतीने सत्कारासह सन्मान करण्यात आला.
यांची लाभली उपस्थिती
बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, डी.पी.साळुंखे, ज्योती पावरा, चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, युवक तालुकाध्यक्ष पवन पाटील, सईदभाई, अन्वर खान, साकळीचे सरपंच दीपक पाटील, फैजपूरचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, यावलचे शहराध्यक्ष करीम मण्यार, अमोल दुसाने, हितेश गजरे, डी.एम.पाटील, नरेंद्र पाटील, ललित पाटील, प्रसन्न पाटील, किरण पाटील, सलीम तडवी, समाधान पाटील, दत्रातराय पाटील, बापू जासूद, शशिकांत पाटील, अरुण लोखंडे, कामराज घारू, मोहसीन खान, सद्दाम खान, निलेश बेलदार, पितांबर महाजन, मंगला नेवे, ममता आमोदकर, भगवान बर्डे, सहदेव पाटील, गजू पाटील, एजाज मण्यार, नईम शेख, विकी गजरे, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, सचिन येवले, शेख अन्वर, शेख अशपाक भाई, ललित पाटील, विजय साळी, मयूर पाटील, पिंटू कुंभार, सुरेश कुंभार, राहुल गजरे उपस्थित होते.