जामनेरला श्री व्यंकटेश बचत गटाची वार्षिक सभा उत्साहात
साईमत/जामनेर /प्रतिनिधी :
बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या जास्तीत जास्त कर्जाचा, बचत निधीचा वापर उद्योगासाठी करावा. बचत गट आता बचत गट म्हणून मर्यादित न राहता उत्पादक, व्यावसायिक गट म्हणून पुढे यावा, विविध उपप्रकल्पात सहभाग घेऊन गटाच्या आणि आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करावी., असे मत व्यंकटेश गटाचे मार्गदर्शक अमोल झाल्टे यांनी व्यक्त केले. जामनेर येथील हाॅटेल राधाकृष्ण, नाकोडा पार्क येथे व्यंकटेश बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संदीप महाजन होते.
सभेत मागील वर्षाचा हिशोब, जमा खर्चास मंजूर देवून कर्ज वाटप मर्यादा ७५ ते ८० हजारापर्यंत ठरविण्यात आली. मासिक वर्गणी दीड हजार व व्याजदर १.५ टक्के ठेवण्यात आले. सभासदांनी आपली कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून बचत गटाचे नवस्वरूप व पुढील वर्षाचे नियोजन याबाबत गटाचे सचिव जितेंद्र गोरे यांनी माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
गटाचे सभासद अमोल झाल्टे, अरूण महाजन, अरूण मिरगे, गजानन पवार, समाधान माळी, गोरख सोनार, अश्विन रोकडे, रवींद्र पर्वते, सागर औटी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जितेंद्र गोरे, सुत्रसंचलन अश्विन रोकडे तर आभार गजानन पवार यांनी मानले.