Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मलकापूर»घिर्णीला बुद्धासह महामानवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
    मलकापूर

    घिर्णीला बुद्धासह महामानवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

    येथुन जवळील घिर्णी येथे नवीन विहाराची निर्मिती करुन बुद्ध विहारात बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना आणि बाबासाहेबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त धम्मोत्सवाचे आयोजन घिर्णी येथील सर्व उपासकांनी केले होते. यासाठी शांताराम इंगळे, उत्तम इंगळे (फौजी) यांचे प्रमुख योगदान होते. बुद्ध मूर्तीचे दान उपासक उत्तम इंगळे तर बाबासाहेबांच्या मूर्तीचे दान एन.डी. इंगळे यांनी केले. कार्यक्रमात १४ भंतेजी उपस्थित होते.

    यावेळी भदंत सुगतवंस महाथेरो श्रीलंका, भदंत ज्ञानदिप महाथेरो, भदंत विनयपाल महाथेरो, भदंत धम्मसरण महाथेरो, भिक्खु यश श्रीलंका, भंते उपतिस्स मिझोरम आदी भंते लोकांनी उपस्थितांना प्रवचनातून धम्म विषयावर प्रबोधन केले.

    यावेळी सर्व भंतेजींना चीवर दान, अन्य यथोचित दान देण्यात आले. मलकापूर येथून अशांतभाई वानखेडे (माजी नगरसेवक), मुंबईतून अरविंद भंडारे, डॉ.प्रा.सिध्दार्थ मेश्राम, प्रा.प्रफुल्ल खंडारे आदी मान्यवरांनी दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम आजूबाजूच्या अनेक गावांना आदर्श ठरला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

    यशस्वीतेसाठी भिकाजी तायडे, उदेभान इंगळे, अरुण इंगळे, मधुकर इंगळे, आनंद बुद्ध विहार समिती, धम्म संस्कार युवक संघ, प्रजापती गौतमी महिला मंडळ, घिर्णी येथील आनंद बुद्ध विहार, धम्म संस्कार युवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Malkapur : मलकापूरमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली

    January 31, 2026

    Malkapur:मलकापूरला धक्का व्यवसायिक ऑटोचालकाचा रस्त्यावर निर्घृण खून

    January 8, 2026

    Malkapur:पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील कामकाजाचे मार्गदर्शन

    January 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.