स्मशानभूमीत चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी मनपाच्या आयुक्तांना निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कंजरभाट समाजाच्या युवांनी आपले सामाजिक कर्तव्य बजावत जळगाव महानगरपालिका आयुक्तांना मेहरूण परिसरातील कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले. याप्रसंगी फाउंडेशनचे सचिव राहुल नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, योगेश बागडे, विजय अभंगे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, वीर दहियेकर, सुमित माछरेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीत वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर फाउंडेशनने सुरक्षा व्यवस्थेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली. निवेदन स्वीकारत आयुक्तांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधित विभागाला संबंधित कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले. कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या पुढाकारामुळे स्मशानभूमीतील सुरक्षा वाढेल आणि भविष्यातील चोरीसारख्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळेल, असे स्थानिक नागरिकांनी आश्वासनाबाबत समाधान व्यक्त केले.