विद्यापीठात मेथॉडॉलॉजी विषयावरील कार्यशाळेस प्रारंभ

0
23

साईमत जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा ( पेट ) २०२३ नुसार तात्पुरत्या प्रवेशित विद्यार्थ्यांची रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयावरील कार्यशाळेस सोमवार दि. ५ फेब्रुवारी पासून विद्यापीठात प्रारंभ झाला. या कार्यशाळेचे उद्धाटन कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेचा लाभ ३७६ विद्यार्थ्यांनी घेतला.

यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा.पी.पी.माहुलीकर, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रा.एस.टी.भुकन आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रााचार्य एस.एस.राजपूत उपस्थित होते.
या प्रसंगी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चा विषय निवडी संदर्भात व संशोधनासंदर्भात विविध मुद्दयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा दि.५ ते १० फेब्रुवारी दरम्यान विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदरची कार्यशाळा दोन सत्रात आयोजित केली असून प्रथम सत्रात दि. ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील सर्व विद्यार्थी, विधी आणि माहिती व ग्रंथालयशास्त्र याविषयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उदघाटनानंतरच्या प्रथम सत्रात प्रा.बी.एल.चौधरी, व्दितीय प्रा.डी.एस. दलाल आणि प्रा.पी.पी. माहुलीकर यांनी रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयावर विद्यार्थ्यांना उदबोधन केले. या कार्यशाळेत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विविध विषयांचे, विधी आणि माहिती व ग्रंथालयशास्त्र याविषयातील एकूण ४०९ पैकी ३७६ विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यशाळेचे दुसऱे सत्र दि.८ ते १० फेब्रुवारी दरम्यान मानवविज्ञान विद्याशाखेतील सर्व विषय व वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा तसेच आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता आयोजित केले जाणार आहे. या संदर्भातील वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here