धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचा प्रारंभ

0
11

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. यावेळी गावातील ज्यांचे वय ६५ आहे. त्यांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी गावात आशा वर्कर यांच्याकडून जनजागृती करण्यात येत आहे. सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडून गावातील काही नावांची यादी आलेली आहे. त्यानुसार केंद्रात काम सुरू आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली सरोदे, आरोग्य सहायिका भारती सोनवणे, भिकुबाई बोराडे, आशा वर्कर रत्नाबाई कोळी, अमोल महाजन, प्रवीण ठाकूर हे गावातील आलेल्या वयोश्री यांचे अर्ज भरून देत आहेत. सर्व भरलेले अर्ज शासनाकडे जमा करण्यात येणार आहेत. तसेच नियमानुसार वयोश्री योजनेस पात्र असणाऱ्यांना वृद्धापकाळ सुखकर होण्यासाठी श्रवणयंत्र, ट्रायपोड कमोड खुर्ची, निब्रेस स्टीक, व्हील चेअर, लंबर बेल्ट, फोल्डिंग वॉकर, सवाईकल कॉलर आदी साहित्य मिळणार आहे. यासाठी ६५ वर्षावरील वृध्दांकडून आधारकार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक घेऊन अर्ज भरले जात आहे. तसेच स्वयंघोषणा पत्रही भरण्यात येत आहे.

एक कि.मी. पायपीटमुळे गावात शिबिर घेण्याची मागणी

गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गावाबाहेर एक किलोमीटर आहे. वयोश्री योजनेसाठी ६५ वर्षावरील नागरिकांना १ किलोमीटर चालत जावे लागत आहे. अर्ज भरण्यासाठी सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे त्यांना पायपीट करून जावे लागत आहे. यासाठी गावातच शिबिर लावून वयोश्री योजनेचे अर्ज भरावेत, अशी मागणी चोपडा तालुका मानवाधिकार संघटनेचे महिला तालुकाध्यक्ष योगेश्‍वरी सोनवणे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here